Feat

Paralysis

अतिताणाचा ‘पॅरालिसिस’ धोका

image3344

अतिताणाचा ‘पॅरालिसिस’ धोका

 

 

सतत धावपळ, अतिताण, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडची रेलचेल, अशी काहीशी आपली जीवनशैली झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ताण, रक्तदाब, नैराश्य,

 

निद्रानाश. परिणामत: डोक्यातील नस फाटून रक्तस्राव होणे किंवा डोक्यातील रक्तवाहिन्या अवरुद्ध होऊन मेंदूच्या विशिष्ट भागांना रक्तपुरवठा न होणे आणि यामुळे पॅरालिसिसचा

झटका येणे, असे धोके आहेत. अर्धांगवायूचा झटका आल्यावर शरीराचा डावा किंवा उजवा, खालचा किंवा वरचा भाग निकामी होतो.

 

५८ वर्षांचे एक गृहस्थ चार वर्षांपूर्वी उपचारासाठी आले होते. तेव्हा त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन एक वर्ष झाले होते. डावा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. हाता-पायात संवेदना

नव्हत्या. डाव्या हातात-पायात खूप जास्त कडकपणा होता. चालता येत नव्हते आणि व्यवस्थित बोलताही येत नव्हते. तपासणीअंती लक्षात आले की, डाव्या हाताचा आणि पायाचा

मोठ्या प्रमाणावर शक्तिक्षय झाला होता. हात-पाय सामान्यापेक्षा बारीक झाले होते. उपचार चार महिने करणे आवश्यक होते. पहिल्या १५ दिवसांत अभ्यंगम्, स्वेदन, नस्यम् आणि

बस्ती दिले. बस्ती देताना आलटून-पालटून काढा दिला. यामुळे कडकपणा कमी व्हायला, हाता-पायांचा आकार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. रक्ताभिसरणही सुरळीत होऊ लागले.

मेंदूचा अपक्षय भरून काढण्यासाठी, शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान करण्यासाठी, शरीरात वाढलेले वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान

करण्यासाठी, चेतापेशी पूर्ववत करण्यासाठी पोटातूनही औषध सुरू केले. पहिल्या महिन्यातील शेवटच्या १५ दिवसांत शिरोबस्ती, बस्तीसोबत नवराकिडी, मासकिडी असे उपचार

केले. या पंधरा दिवसांत स्थैर्य आले. हाता-पायांना संवेदना, चेतना आली. बऱ्यापैकी हालचाल होऊ लागली.

 

पुढील १५ दिवसांसाठी शिरोधारा, एलाकिडी (पोटली मसाज) आणि बस्ती असा उपचार ठेवला. शिरोधारा म्हणजे कपाळावर तेलाची सतत धार सोडली जाते. यामुळे शरीरातील

मर्मस्थाने सक्रिय होतात. डोक्यात रक्ताभिसरण वाढून मेंदूचे पोषण होते. या गृहस्थांच्या मेंदूमध्ये क्षय झाला होता. तो वेगाने भरून निघाला. पक्वाशयात गेलेल्या बस्ती

औषधांमुळे वात कमी करता आला. शरीरातील विषद्रव्य गुद मार्गाद्वारे बाहेर काढता आले. पोटली उपचारामुळे रक्ताभिसरण वाढले, सगळ्या वाहिन्यांच्या संवेदना वाढल्या,

मजबुती वाढली. त्यानंतरच्या १५ दिवसांत पिडिचिल, बस्ती, नस्यम् उपचार केले. अशक्तपणा कमी झाला. नस्यममुळे औषधी द्रव्य नाकामधून मेंदूपर्यंत गेल्याने विषद्रव्याचे

विलयन होऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मेंदू सक्रिय होऊन त्याचे पुनरुज्जीवन होऊ लागले. ‘स्पायनल कॉर्ड’ला मजबुती आली. दुसऱ्या महिन्याच्या शेवटी कडकपणा जवळपास

नाहीसा झाला. बोलता येऊ लागले आणि काठीच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न होऊ लागला.

 

तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुन्हा नवराकिडी, बस्ती आणि शिरोबस्ती केले. शिरोबस्तीमुळे डोक्यातील ब्रम्हरंध्र व शिरोभागातून तेल आत गेल्याने रक्तस्राव किंवा

रक्त गोठल्यामुळे मेंदूत जे बदल झाले होते ते सामान्य होण्यास व मृत भाग पुनरूज्जीवीत होण्यास त्या तेलाची मदत झाली. नवराकिडीमुळे मांसपेशी दृढ झाल्या.

 

दुसऱ्या पंधरवड्यात थालपोडीचितल-डोक्यावर विशिष्ट द्रव्याचा लेपामुळे डोक्यातील झीज भरून निघाली. अभ्यंगम व स्वेदनमुळे शरीरात मजबूती येऊ लागली. स्वेदनाद्वारे

विषद्रव्य बाहेर काढले गेले. अभ्यंगामुळे रक्ताभिसरण वाढून रसवाहिन्यांद्वारेही विषद्रव्य निघाले. चौथ्या महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत शिरोधारा, कषायबस्ती, स्नेहबस्ती व

नवराकिडी केले. यामुळे आणखी सुधारणा झाल्यात. उपचाराच्या शेवटच्या पंधरा दिवसांत शिरोबस्ती, पिडीचिल, कषायबस्ती, स्नेहबस्ती उपचार केले. यामुळे राहिलेले सर्व दोष,

व्याधी दूर झाल्या. या सर्व प‍्रक्रियेदरम्यान बोलण्यातील दोषासाठी गंडुष म्हणजे वातहारक काढा मुखातून गुळण्या करण्यास दिला. यामुळे कंठातील वात कमी होऊन संज्ञा-स्थापना

होते.

 

 

 

Spondolytis

मान मोलाची मानावी

neck11

मान मोलाची मानावी

 

माणसाची जीवनशैली बदलली आहे. रोजची धकाधक वाढली आहे. व्यायामाप्रती जागरूकता असली तरी वेळेचा अभाव आणि त्यानुषंगाने शरीराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शरीराची

 

हानी ती होतेच! शरीराच्या विविध भागांचे कार्यचक्र बिघडते. मानेचेही तसेच. सततच्या धावपळीमुळे मानेवर, मणक्यावर सतत ताण येतो. मानेचा व्यायाम फारसा केला जात नाही.

मानेला किंवा मणक्यांना झटका वा धक्का अनेकदा बसतो. अपघातामुळे मणक्यांना इजा होते. या सर्व बाबींमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस अर्थात मानेवरमणक्यांवर सूज

येण्याचा धोका असतो. दाह होऊ शकतो. हा त्रास आज अनेकांना आहे.

 

एक सहासात वर्षांपूर्वी माझ्याकडे ४५ वर्षांची एक महिला आली होती. त्यांची तक्रार म्हणजे त्यांना सतत खूप चक्कर येत होते. उभे राहणे अशक्यच होते. आपण पडू की काय अशी

सारखी भीती वाटत होती. मान दुखतही होती. एकटे फिरणे शक्यच नव्हते. त्यांचे पती सोबत होतेच. तपासणी केली आणि विचारपूस केली असता, माझ्याकडे येण्यापूर्वी चार

वर्षांपासून असा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. मेंदूच्या सीटी स्कॅनपासून सगळ्या चाचण्या करून झाल्या होत्या. हाताला मुंग्या येतात, चमकाही निघतात, उजव्या हाताची

बोटे बधिर झाल्यासारखी वाटतात, पाठ आणि मणक्यात वेदना जाणवतात, असेही बोलताना त्यांनी सांगितले. मी त्यांच्या मानेचा एक्सरे पाहिला. त्यामध्ये त्यांना मानेचा

स्पॉन्डिलायटिस असल्याचे दिसत होते. म्हणून त्यांना एमआरआय करण्यास सांगितले.

 

एमआरआयमध्ये त्यांच्या पाठीच्या पाचव्यासहाव्यासातव्या मणक्यात दाब आणि पाचव्यासहाव्या मणक्यातील गादी खूपच जास्त दबली असल्याचे आढळले. त्यांना मानेचा

(सर्व्हायकल) स्पॉन्डिलायटिस असल्याचे पक्के झाले. यावर उपचार म्हणून तीन महिने पोटातून औषध आणि एक ते दीड महिना केरळीय पंचकर्म करावे लागेल हे त्यांना समजवून

सांगितले. त्यांची सहमती मिळाल्याबरोबर उपचार सुरू केले.

 

पहिले सात दिवस अभ्यंगम स्वेदन केले त्याबरोबर ग्रीवा बस्ती सुरू केली. त्यासाठी नाडी दोषानुसार तेलाची निवड केली. ग्रीवा बस्ती सोबतच नस्यम बस्ती पण दिली.

ग्रीवा बस्तीमुळे तेथील सिग्धता वाढली, मानेवरील सूज कमी होण्यास सुरुवात झाली. नस्यममुळे डोक्यातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास तर पोटात बस्ती दिल्याने शरीरातील

वात कमी करण्यास मदत झाली. हाडांची मजबुती वाढवण्यासही मदत झाली. दुसऱ्या आठड्यात मानेवर औषधी द्रव्यांची धार सोडली. काही औषधांचा लेप मानेवर दिला. नस्यम

बस्ती सुरू ठेवले. औषधी द्रव्यांच्या धारेमुळे आणि तेथील मसाजमुळे मणके स्वस्थ आणि मजबूत झाले. त्या मणक्यातील लवचिकता आणि स्निग्धता वाढली.

 

तिसऱ्या आठड्यात पोटली मसाज केले. राहिलेले सगळे दुखणे आणि मणक्यातील गॅप पोटली मसाजने भरून काढले. तेथील रक्ताभिसरण वाढले. मणके पूर्णपणे स्वस्थानी बसले.

चौथ्या आठड्यात पुन्हा ग्रीवा बस्ती, नस्यम बस्ती असा उपचार केला. पाचव्या आठड्यात नवराकिडी केली. या सर्व चिकित्सेमुळे त्यांच्या उजव्या हाताच्या तिन्ही बोटातील

बधिरपणा निघून गेला. हाताला मुंग्या येणे, चमका निघणे, मानेचे दुखणे बंद झाले. चक्कर येणे थांबले. केरळीय पंचकर्माबरोबर अभ्यांतर औषधांची रचना करताना, मानेची

लवचिकता, स्निग्धता वाढेल, हाडांची मजबुती वाढेल सोबतच दीपन पाचन वाढेल आणि मन्यागत वातकमी करेल अशी योजना केली. आज ती महिला पूर्णपणे बरी आहे.

Psoriasis

सोरिअॅसिस आवरता येतो!

scalp-psoriasis-treatment-and-causes

सोरिअॅसिस आवरता येतो!

 

 

सोरिअॅसिस किंवा कंडू किंवा विसर्पिका हा अगदी सामान्यपणे आढळणारा आजार. हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे स्वरूपही वेगळेवेगळे असू शकते. माझ्याकडे एक

४५ वर्षांच्या गृहिणी आल्या होत्या. संपूर्ण शरीरावर लाल चकले, त्यावर खवले धरले होते. खाजही होती. त्यातून कधी रक्तस्राव तर कधी पूस्रावही व्हायचा. त्यांच्या डोक्यात खवडा

झाला होता. खूप खाज आणि सोरिअॅसिसचे पॅचही होते. एकूणच त्वचा खूप कोरडी आणि जाड झाली होती. त्यांची विचारपूस केली असता त्यांना खूप जास्त ताण असल्याचे लक्षात

आले. जेवणाच्या वेळाही अनियमित होत्या, शिवाय जेवणाकडे दुर्लक्षही होते.

 

ही त्या रुग्ण महिलेत आढळलेली लक्षणे आणि कारणे. या बरोबरच धावपळ, अतिशय जास्त ताणपातळी, अनावश्यक विचार, मनाचा कमकुवतपणा, अतिहळवेपणा किंवा

संवेदनशीलता, शरीराची नीट काळजी घेणे, रात्रीचे जागरण, रात्री दह्याचे सेवन, अपथ्य, जास्त आंबट किंवा आंबवलेल्या पदार्थांचे सेवन, फास्ट फूड, जंक फूड, पोटात जंत, खूप

जास्त प्रमाणात औषधी सेवन, त्वचा संवेदनशील असणे, रक्तदोष इत्यादी कारणांमुळे सोरिअॅसिस होऊ शकतो.

 

पूर्ण बरे होण्यासाठी सहा ते आठ महिने नियमित उपचार घ्यावे लागतील याची कल्पना मी त्यांना दिली. सोरिअॅसिस पित्त दोष आणि उष्ण प्रकृतीमुळेही होतो. त्यामुळे उपचार

करताना रक्त शुद्धीकरण, पित्तदृष्टी दूर कशी करता येईल, रक्तदोष कसे दूर करता येतील याचा विचार आधी केला. प्रथम, सात दिवस अभ्यंगम् केले. मसाजसाठी वर्णगणातील

आणि कृष्ठघ्न तेलाची (औषधीयुक्त) जाणीवपूर्वक निवड केली. त्यानंतर तक्रधारा केली. यामध्ये पित्तशाम औषधाने तक्र सिद्ध केले आणि त्याने तक्रधारा केली. दुसऱ्या

आठवड्यानंतर जवळजवळ ६०७० टक्के आराम होता. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा तक्रधाराकेली. कुष्ठाघ्न तेलाने मालिश केले आणि काही औषधांची बस्ती दिली. त्यानंतर ९०

टक्के पॅचेस नाहिसे झाले. जे काही छोटे एकदोन पॅचेस उरले होते त्यावर सातसात दिवसांनी जळू चिकित्सा केली. आठ महिने त्यांना पोटातून घेण्यासाठी औषध दिले त्यामध्ये

महामंजिष्ठाधि काढा, पंचतिक्तधृत, मणिभद्रलेह, स्नुह्यादीलेह, सोरिया तेल, महातिक्ताघृत, एलादि तेल, दिनेशवल्यादिकेरम, नाल्पामरादिकेरम, प्रभंजन विमर्दनम् तेल

इत्यादीचा समावेश होता. हरिद्राखंड, खदिरारिष्टम, आरग्वधारिष्टम, गोक्षुरादिगुलिका यांचाही वापर केला.

 

या औषधांनी रक्त पित्तदृष्टी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही दृष्टी नाहीशी झाल्याने त्वचेचे स्तर आतून भरत आले. नाडी आणि दोषांची अवस्था पाहूनच कटाक्षाने औषधी

पंचकर्म योजना करावी लागते. त्या महिला या उपचाराने ठणठणीत बऱ्या झाल्या. मागील पाच वर्षांपासून त्यांना कोणताही त्रास नाही. योग्य आहार, शरीराची नीट निगा राखली,

ताणांचे व्यवस्थित समायोजन केले तर सोरिअॅसिस नक्की टाळता येतो.