Spondolytis

Spondolytis

मान मोलाची मानावी

neck11

मान मोलाची मानावी

 

माणसाची जीवनशैली बदलली आहे. रोजची धकाधक वाढली आहे. व्यायामाप्रती जागरूकता असली तरी वेळेचा अभाव आणि त्यानुषंगाने शरीराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शरीराची

 

हानी ती होतेच! शरीराच्या विविध भागांचे कार्यचक्र बिघडते. मानेचेही तसेच. सततच्या धावपळीमुळे मानेवर, मणक्यावर सतत ताण येतो. मानेचा व्यायाम फारसा केला जात नाही.

मानेला किंवा मणक्यांना झटका वा धक्का अनेकदा बसतो. अपघातामुळे मणक्यांना इजा होते. या सर्व बाबींमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस अर्थात मानेवरमणक्यांवर सूज

येण्याचा धोका असतो. दाह होऊ शकतो. हा त्रास आज अनेकांना आहे.

 

एक सहासात वर्षांपूर्वी माझ्याकडे ४५ वर्षांची एक महिला आली होती. त्यांची तक्रार म्हणजे त्यांना सतत खूप चक्कर येत होते. उभे राहणे अशक्यच होते. आपण पडू की काय अशी

सारखी भीती वाटत होती. मान दुखतही होती. एकटे फिरणे शक्यच नव्हते. त्यांचे पती सोबत होतेच. तपासणी केली आणि विचारपूस केली असता, माझ्याकडे येण्यापूर्वी चार

वर्षांपासून असा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. मेंदूच्या सीटी स्कॅनपासून सगळ्या चाचण्या करून झाल्या होत्या. हाताला मुंग्या येतात, चमकाही निघतात, उजव्या हाताची

बोटे बधिर झाल्यासारखी वाटतात, पाठ आणि मणक्यात वेदना जाणवतात, असेही बोलताना त्यांनी सांगितले. मी त्यांच्या मानेचा एक्सरे पाहिला. त्यामध्ये त्यांना मानेचा

स्पॉन्डिलायटिस असल्याचे दिसत होते. म्हणून त्यांना एमआरआय करण्यास सांगितले.

 

एमआरआयमध्ये त्यांच्या पाठीच्या पाचव्यासहाव्यासातव्या मणक्यात दाब आणि पाचव्यासहाव्या मणक्यातील गादी खूपच जास्त दबली असल्याचे आढळले. त्यांना मानेचा

(सर्व्हायकल) स्पॉन्डिलायटिस असल्याचे पक्के झाले. यावर उपचार म्हणून तीन महिने पोटातून औषध आणि एक ते दीड महिना केरळीय पंचकर्म करावे लागेल हे त्यांना समजवून

सांगितले. त्यांची सहमती मिळाल्याबरोबर उपचार सुरू केले.

 

पहिले सात दिवस अभ्यंगम स्वेदन केले त्याबरोबर ग्रीवा बस्ती सुरू केली. त्यासाठी नाडी दोषानुसार तेलाची निवड केली. ग्रीवा बस्ती सोबतच नस्यम बस्ती पण दिली.

ग्रीवा बस्तीमुळे तेथील सिग्धता वाढली, मानेवरील सूज कमी होण्यास सुरुवात झाली. नस्यममुळे डोक्यातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास तर पोटात बस्ती दिल्याने शरीरातील

वात कमी करण्यास मदत झाली. हाडांची मजबुती वाढवण्यासही मदत झाली. दुसऱ्या आठड्यात मानेवर औषधी द्रव्यांची धार सोडली. काही औषधांचा लेप मानेवर दिला. नस्यम

बस्ती सुरू ठेवले. औषधी द्रव्यांच्या धारेमुळे आणि तेथील मसाजमुळे मणके स्वस्थ आणि मजबूत झाले. त्या मणक्यातील लवचिकता आणि स्निग्धता वाढली.

 

तिसऱ्या आठड्यात पोटली मसाज केले. राहिलेले सगळे दुखणे आणि मणक्यातील गॅप पोटली मसाजने भरून काढले. तेथील रक्ताभिसरण वाढले. मणके पूर्णपणे स्वस्थानी बसले.

चौथ्या आठड्यात पुन्हा ग्रीवा बस्ती, नस्यम बस्ती असा उपचार केला. पाचव्या आठड्यात नवराकिडी केली. या सर्व चिकित्सेमुळे त्यांच्या उजव्या हाताच्या तिन्ही बोटातील

बधिरपणा निघून गेला. हाताला मुंग्या येणे, चमका निघणे, मानेचे दुखणे बंद झाले. चक्कर येणे थांबले. केरळीय पंचकर्माबरोबर अभ्यांतर औषधांची रचना करताना, मानेची

लवचिकता, स्निग्धता वाढेल, हाडांची मजबुती वाढेल सोबतच दीपन पाचन वाढेल आणि मन्यागत वातकमी करेल अशी योजना केली. आज ती महिला पूर्णपणे बरी आहे.