Psoriasis

Psoriasis

सोरिअॅसिस आवरता येतो!

scalp-psoriasis-treatment-and-causes

सोरिअॅसिस आवरता येतो!

 

 

सोरिअॅसिस किंवा कंडू किंवा विसर्पिका हा अगदी सामान्यपणे आढळणारा आजार. हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे स्वरूपही वेगळेवेगळे असू शकते. माझ्याकडे एक

४५ वर्षांच्या गृहिणी आल्या होत्या. संपूर्ण शरीरावर लाल चकले, त्यावर खवले धरले होते. खाजही होती. त्यातून कधी रक्तस्राव तर कधी पूस्रावही व्हायचा. त्यांच्या डोक्यात खवडा

झाला होता. खूप खाज आणि सोरिअॅसिसचे पॅचही होते. एकूणच त्वचा खूप कोरडी आणि जाड झाली होती. त्यांची विचारपूस केली असता त्यांना खूप जास्त ताण असल्याचे लक्षात

आले. जेवणाच्या वेळाही अनियमित होत्या, शिवाय जेवणाकडे दुर्लक्षही होते.

 

ही त्या रुग्ण महिलेत आढळलेली लक्षणे आणि कारणे. या बरोबरच धावपळ, अतिशय जास्त ताणपातळी, अनावश्यक विचार, मनाचा कमकुवतपणा, अतिहळवेपणा किंवा

संवेदनशीलता, शरीराची नीट काळजी घेणे, रात्रीचे जागरण, रात्री दह्याचे सेवन, अपथ्य, जास्त आंबट किंवा आंबवलेल्या पदार्थांचे सेवन, फास्ट फूड, जंक फूड, पोटात जंत, खूप

जास्त प्रमाणात औषधी सेवन, त्वचा संवेदनशील असणे, रक्तदोष इत्यादी कारणांमुळे सोरिअॅसिस होऊ शकतो.

 

पूर्ण बरे होण्यासाठी सहा ते आठ महिने नियमित उपचार घ्यावे लागतील याची कल्पना मी त्यांना दिली. सोरिअॅसिस पित्त दोष आणि उष्ण प्रकृतीमुळेही होतो. त्यामुळे उपचार

करताना रक्त शुद्धीकरण, पित्तदृष्टी दूर कशी करता येईल, रक्तदोष कसे दूर करता येतील याचा विचार आधी केला. प्रथम, सात दिवस अभ्यंगम् केले. मसाजसाठी वर्णगणातील

आणि कृष्ठघ्न तेलाची (औषधीयुक्त) जाणीवपूर्वक निवड केली. त्यानंतर तक्रधारा केली. यामध्ये पित्तशाम औषधाने तक्र सिद्ध केले आणि त्याने तक्रधारा केली. दुसऱ्या

आठवड्यानंतर जवळजवळ ६०७० टक्के आराम होता. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा तक्रधाराकेली. कुष्ठाघ्न तेलाने मालिश केले आणि काही औषधांची बस्ती दिली. त्यानंतर ९०

टक्के पॅचेस नाहिसे झाले. जे काही छोटे एकदोन पॅचेस उरले होते त्यावर सातसात दिवसांनी जळू चिकित्सा केली. आठ महिने त्यांना पोटातून घेण्यासाठी औषध दिले त्यामध्ये

महामंजिष्ठाधि काढा, पंचतिक्तधृत, मणिभद्रलेह, स्नुह्यादीलेह, सोरिया तेल, महातिक्ताघृत, एलादि तेल, दिनेशवल्यादिकेरम, नाल्पामरादिकेरम, प्रभंजन विमर्दनम् तेल

इत्यादीचा समावेश होता. हरिद्राखंड, खदिरारिष्टम, आरग्वधारिष्टम, गोक्षुरादिगुलिका यांचाही वापर केला.

 

या औषधांनी रक्त पित्तदृष्टी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही दृष्टी नाहीशी झाल्याने त्वचेचे स्तर आतून भरत आले. नाडी आणि दोषांची अवस्था पाहूनच कटाक्षाने औषधी

पंचकर्म योजना करावी लागते. त्या महिला या उपचाराने ठणठणीत बऱ्या झाल्या. मागील पाच वर्षांपासून त्यांना कोणताही त्रास नाही. योग्य आहार, शरीराची नीट निगा राखली,

ताणांचे व्यवस्थित समायोजन केले तर सोरिअॅसिस नक्की टाळता येतो.