Insomnia

BLOGSInsomnia

शांत झोपाचे महत्व:

1504519088-0092

 

शांत झोपाचे महत्व: झोप ही एक अशी तंत्रना आहे  जी शरीर व मन दोघाना  विश्राम देणारी असते. पुरसे  झोप  ही शरीर व मनाची आवश्यक  गरज आहे २४ तासातुन  किमान ६ ताशाची झोप आवश्यक  आहे. आणि लागणारी झोप ही शांत असणे sound sleep  आवश्यक असते .चारकांनी निद्रेची  व्याख्या सांगताना   म्हणले आहे  कि ???यंदा तू  मनाशी  कालान्ते कार्मात्मान : काल्मानीत्वाता: | विषयेभ्यो निवतात्ता तदा स्वपिति मानव: ||

अशी  अवस्था ज्या मध्ये . इंद्रिय आपआपल्या विषयापासून निव्रत होतात व मन देखील पूर्णत :  थकून जातो . ते  आपले कार्य करण्यास  असमर्थ  होतात . त्या अवस्थेला   निद्रा असे म्हणतातः

निद्रेच लाभ :

यथाविधी घेतलेली झोप , शारीरिक व मानसीक पोषण करणारी , कार्मेंद्रीयाची  कार्याक्षमता वाढविणारी, दीर्घायुष्य देणारी  असते  उलट अपुरी   निद्रा ही  दुखः ,कृशता ,दुर्बलता ,नपुंसकता ,अज्ञान तथा मृत्युकारक असते . इतकी महत्व्वपूर्ण  असते झोप . पण आजकल कित्येक लोक अनिद्रा या त्रासापासून झुजत असतात.

जास्त चहा,  कॉफीचे व्यसन , कामाचा बोझा शारीरिक विकृती  मानसिक ताण  – तणाव यांमुळे कित्येक लोकांना आनिद्रचा त्रास होतो तसेच आजकालचे जीवन प्रतिस्पर्धात्व झाले आहे परिणाम स्वरूपी लोक आपले क्षमत्व दाखवाण्यासाठी ओवर time  करतात . झोपोची वेळ निघून जाते पण काम संपता संपत  नाही व  वेळ  गेल्यानंतर झोपायला गेल्यास तास २ तास झोपच लागत नाही. कित्त्येक लोक  झोप लागते  पण एकदा   जाग आल्यास परत झोप येतच नाही किवा  शांत  झोप लागतच नाही ही तक्रार घेयून क्लिनिक मध्ये येतात. तुम्ह्ला माहिती नासेल पण अपुऱ्या झोपेमुळे हृदयाघात,उच्चरक्तदाब ,शुगर  , किडनी, विकार देखील होवू  शकतात रक्तासील इंटर क्युलीन  ६ ( आय  एल ६)ट्युमर नेक्रोसीस फक्टर अल्फा (टी.एन .एफ  अल्फा) सी .रीअक्टीव प्रोटीन  ( सी .आर .पी  ) ही घातक  द्रव अपुरया  झोपे मुळे  शर्रीरात वाढतात . ही द्रव्य प्रमाणपेक्षा वाढली तर रक्ताची गुठळी होण्याची शक्यता ही ३ पतीने वाढते .ही गुठळी   हृदयच्या रक्तावाहीनित अडकल्यास  heart attack   यतो.

शरीरातील हार्मोन चे संतुलन ठेवण्याचे  काम pituitary gland   चे असते जी  मेंदू मध्ये  असते . मेंदूचे कार्याक्षमात्व  हे झोपवर  अवलबून असते नावाचे हार्मोन भूक  व लेप्तीन  हे  हार्मोन पोट भरले आहे. या साठी जवाबदार असते . अपुरया  झोपेमुळे शरीरात घरेलीन   हार्मोनचे प्रमाण वाढते  तर लेप्तीन  हार्मोनचे प्रमाण कमी होते परिणामी  आपल्याला जास्त भूक लागते व त्यामुळे स्थूलता  येते . झोप ही शरीरातील इन्सुलिन  या हार्मोन वर पण प्रभाव टाकते . इन्सुलिन हे शरीरातील शर्करेवर नियंत्रण ठवते . अपुऱ्या झोपेमुळे शरीरात इन्सुलिन   कमी स्रवते  परिणाम मधूमेह  हा रोग होतो .  हीच झोप जर  पुरशी व योग्य वेळ घत्तली तर आपली  रोग –प्रतिकार  क्षमता वाढते व व्यक्ती विविध  रोगांना बळी पडत नाही . झोपतच शरीरातील नवीन पेशी तयार होतात आणि शरीरात तयार होणारी अनेक घातक रसायने नष्ट केली  जातात.एका संशोधनानुसार पुरसे व योग्य  झोप ही – निर्णयशमता स्मरणसक्ती  सर्जनशीलता वाढविणारी असते . झोपेमुळे मेंदु आपले काम सुरळीत  करतो . मेंदूच  नाही तर शारीरातील सर्व अवयवाचा थकवा दूर होतो व सर्व अवयव हे उत्साहाने काम करायला लागतात . शांत झोप ही मनुष्याला उत्पादन क्षम बनविते . जर झोप व्यवस्थित झाले नाही तर मनाची चिडचिड  होते व कुठलेही  कार्य व्यवस्थित होत नाही .ज्या प्रमाणे शरीराच्या सुरक्षे साठी आहार आवश्यक असतो त्याप्रमाणे यथायोग्य झोप  सुधा आवश्यक  असते.

म्हणून म्हणतात

Sleep Well and Stay Well !

 

 

 

 

BLOGSInsomnia

निद्रानाश… गंभीर समस्या

Insomnia

निद्रानाशगंभीर समस्या

 

 

आजकाल निद्रानाश ही मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या झाली आहे. कॉर्पोरेट जीवनशैली, स्पर्धा, टार्गेट पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी तडतड, त्यातून निर्माण होणारा

ताण, कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यातील ताण, जोडीला आहारातील बदलांमुळे निर्माण झालेली पोषणमूल्यांची कमतरता यातून निद्रानाश उद्भवतो. तीन वर्षांपूर्वी असेच एक

दाम्पत्य समस्या घेऊन आले. पंचेचाळिशीतील काका त्रस्त होते. एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर होते. त्यांना त्रास म्हणजे झोपच येत नव्हतीनिद्रानाश!

 

रोजची कामं करायलाही अडचणी येत, ऑफिसच्या मीटिंगमध्येही बोलता बोलता थांबून जात. आपण काय करतोय हे कळेनासंच व्हायचं. त्या दोघांशीही बोलताना कळलं की

ऑफिसमध्ये प्रचंड राजकारण, त्यानुषंगाने सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जायचा. त्यातच त्यांना काही मोठे टार्गेट्स मिळाले. तो ताण सतत तीनचार महिने राहिला.

कालांतराने तो ताण पूर्णपणे कमी झाला. पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की त्यांना सतत कशाचीतरी भीती वाटते. रात्रीही अर्धवट झोप लागायची. रात्रभर डोक्यात

विचारांचा घोळ सुरु असायचा. विचारांचे थैमान! या सगळ्याचा त्यांच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम व्हायला लागला. त्यांचीचिडचिड वाढली. उपचार घेतले पण आराम पडला

नाही. योग, प्राणायाम सगळं करून झालं पण विशेष फरक पडला नाही. त्रास वाढला.

 

त्यांचे सर्वांत आधी समुपदेशन केले. सहा महिने औषध घेणे आणि एक महिना पंचकर्म करणे गरजेचे असल्याचे समजावून सांगितले. ताणाच्या आघाताचे शरीर आणि मनावर

दीर्घकाळ परिणाम राहतात. बरेचदा मेंदूतील रक्तसंचारण प्रक्रिया, कार्यक्षमता कमी होते. त्याला अनुसरून काकांना, मेंदूचे स्थैर्य आणि बल वाढवण्यासाठी, डोक्यातील

रक्ताभिसरण वाढवण्यासाठी सारस्वतारिष्टम, स्मृति ग्रॅन्युल्स, कल्याणघृतम सारखी औषधं पोटातून घ्यायला दिली.

 

पंचकर्मास सुरुवात केली. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी पहिले तीन दिवस अभ्यंगम, स्वेदन, नस्यम् आणि बस्ती

दिली. पुढचे सात दिवस शिरोधारा क्रिया केली. डोक्यावरील कातडीतील मर्मबिंदू सक्रिय व्हावे, मेंदूचे पोषण व्हावे, मेंदूचे स्थैर्य आणि बल वाढावे, पीयूषिका ग्रंथीतून संप्रेरक स्त्रवण

वाढावे, विचार करण्याची क्षमता वाढावी, विचारांतील स्थैर्य वाढावे, विचारांतील चंचलता कमी व्हावी तसेच धीधारण क्षमता, धृतीग्रहणक्षमता आणि स्मृतिसाठवण क्षमता वाढावी

म्हणून शिरोधारेची योजना केली. सोबतच वातदोष कमी करण्यासाठी, विषद्रव्यांच्या निवारणासाठी बस्ती दिली.

 

सात दिवसानंतर काकांना चांगली झोप येऊ लागली. पण निराशा आणि इतर लक्षणे फार कमी झाली नाहीत. त्यासाठी पुन्हा सात दिवस अभ्यंगम, स्वेदन, शिरोबस्ती आणि बस्ती

दिली. यामुळे मेंदूचे पोषण, शरीरातील आणि मेंदूतील रक्ताभिसरण वाढले. वात निवारण शमन झाले. दुसऱ्या आठवड्यानंतर ५० टक्के, ६० टक्के सुधारणा दिसली. पुढील सात

दिवस, बलाबल, नाडी आणि इतर सुधारणा पाहून औषधीद्रव्य वापरत शिरोधारा केली. शिरोधारा जसे सजग मनावर कार्य करते तसेच अंतर्मनावर झालेले आघात त्या आघातांमुळे

झालेल्या बदलांवर कार्य करते. स्मृतींना सहन करण्याचे सामर्थ्य देते. त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा शिरोधारा, अभ्यंगम आणि स्वेदन केले. काकांचा त्रास नाहीसा झाला.

 

निद्रानाशेचा विकार असल्यास सुरुवातीला, सतत ताणामुळे छातीत धडधडणे, घाबरल्यासारखे होणे असे होते. हळूहळू झोप कमी होते. वाईट स्वप्न, झोपेत मध्येच दचकून उठणे,

लघुशंकेला गेल्यावर नंतर रात्रभर झोप येणे, सतत विचार सुरू राहणे यामुळे समस्या गंभीर होत जाते. निद्रानाशाची वेळीच योग्य काळजी घेतल्यास त्यातून नैराश्य संभवते. हे

सगळे टाळण्यासाठी एक संतुलित जीवनशैली आवश्यक आहे.