Gout

BLOGSGoutLifestyleOsteoporosis

वातरोगाची ‘कटकट’

वातरोगाचीकटकट

 

आजकाल पन्नाशी ओलांडली की सर्वसाधारणपणे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. वातरोग किंवा सांधेदुखी तीन प्रकारची असते. . संधिवात (ऑस्टियोअर्थ्रायटिस), . आमवात

(रुमॉर्टक अर्थ्रायटिस) आणि . गाठिया वात (गाऊट). वाढत्या वयानुसार सांध्यांमध्ये झीज होते. वंगण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. विशेषतः गुडघ्यांना जास्त त्रास होतो.

गुडघ्यांची वार्धक्यजन्य झीज म्हणजे संधिवात. हा संधिवात म्हणजे वेदना, हालचालीला त्रास! खरचवातआणतो. पण संधिवाताचा त्रास कमी करणारा किंवा कायमचा बंद

करणारा इलाज आयुर्वेदात आहे.

 

पाचसहा वर्षांपूर्वी साठीतल्या एका आजी माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांची पूर्णपणे झीज झाली होती. उजव्या गुडघ्याची जरा जास्तच झाली होती. गुडघ्यांमधून

कटकटअसा आवाजही येत होता. त्यांचा त्रास इतका बळावला होता की उठणे, बसणे, चालणे दुरापास्त झाले होते. मांडी घालून बसता येत नव्हते. पायांत वाकही आला होता.

गुडघ्यांवर सूज होती आणि स्पर्श केल्यावर ती जागा उष्ण असल्याचे जाणवत होते. वेदना तर इतक्या होत्या की स्पर्शही सहन होत नव्हता. एक्सरे काढला असता आजींनासेकंड

ग्रेडचा संधिवात (ऑस्टियोअर्थ्रायटिस) असल्याचे आढळले.

 

या दुखण्याने आजी खूपच त्रस्त झाल्या होत्या. इलाज सुरू झाला. सुरुवातीला सात दिवस औषधांद्वारे दोषांचे पाचन आणि नंतर केरळीय पंचकर्म असा हा उपाय आहे. पंचकर्मात

एक दिवस अभ्यंगम् आणि स्वेदन क्रिया केली. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी एलाकिडी क्रिया सुरू केली आणि हाडांची, सांध्यांची झीज भरून काढण्यासाठी औषधेही सुरू ठेवली.

एलाकिडीसोबत सात दिवस बस्तीही दिली. सात दिवसांच्या या उपचारामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. सांध्यांमध्ये लवचिकता येते. शरीरभर जाणवणाऱ्या वेदना नाहीशा

झाल्या. फक्त गुडघ्यांचा त्रास राहिला होता. दुसऱ्या आठवड्यात जानुधारा सुरू केली. जानुधारा म्हणजे नाडी दोषानुरूप तेल निवडून त्या तेलाची धार जानुसंधीवर सोडली जाते.

त्याबरोबर लेपनम् केले आणि बस्तीही दिली.

 

 

तिसऱ्या आठवड्यात जानुबस्ती दिली. म्हणजे उडदाच्या पिठाची पाळ ठेऊन त्यामध्ये ४५ मिनिटे तेल ठेवले. सोबत लेप दिला आणि सर्वसाधारण बस्तीही दिली. शिवाय पोटातून

वातशामक औषधेही सुरू केली. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी गुडघ्यावरील सूज कमी झाली. स्पर्श सहन होऊ लागला. ‘कटकटआवाज कमी झाला आणि चालण्यात हलकेपणा

जाणवायला लागला. चौथ्या आठवड्यात पिडीचिल उपचार केला. शरीरावर चार लिटर तेल सोडले. मालिश केले. गुडघ्यांना लेप दिला आणि जोडीला बस्ती. पाचव्या आठवड्यात पुन्हा जानुधारा केली. आतापर्यंतचे परिणाम बघून त्यानुसार तेल वापरले. बरोबर लेपनम्, पिचू आणि बस्ती क्रियाही केल्या. आजी आता सामान्यपणे चालू शकत होत्या. बसताही

येऊ लागले. मांडीही घालता येऊ लागली. गुडघ्यांची ८०९० टक्के झीज भरून निघाली. सहाव्या आठवड्यात जानुबस्ती, पिचू, लेप आणि बस्ती चिकित्सा केली. इतक्या उपचारानंतर

 

आजींना व्यवस्थित चालता येऊ लागले. गुडघ्यांमधील वंगण भरून आले. हाडांमधील ठिसूळपणा नाहीसा झाला.

 

गुडघ्यांमधील झीज भरून येण्यासाठी, वंगण भरून येण्यासाठी, कॅलशियमची कमतरता दूर करण्यासाठी, हाडांची मजबूती वाढवण्यासाठी, स्नायू आणि मासपेशींची ताकद

वाढवण्यासाठी, सांधे पूर्ववत करण्यासाठी ही चिकित्सा केली जाते. रुग्णाला तीन महिने पोटातूनही औषध घ्यावे लागते. ठराविक कालावधीत नियमित तपासणीही तितकीच

गरजेची असते.

 

 

 

 

BLOGSGout

वयबंधन झुगारणारा गाठिया वात

642x361_SLIDE_3_Gout_Symptoms

वयबंधन झुगारणारा गाठिया वात

 

न संपणारी धावपळ, प्रचंड धकाधकीचे जीवन, अतिनिद्रा किंवा निद्रेचा अभाव, जेवणानंतर लगेच व्यायाम करणे किंवा पोहणे, खूप जास्त प्रवास, विशेषतः पाय लोंबकळत ठेवून प्रवास, बाइक किंवा इतर टू-व्हीलरवर खूप प्रवास, कडधान्य व डाळींचा खूप जास्त वापर, प्रथिनयुक्त आहाराचे जास्त सेवन, मांसयुक्त आहाराचे सेवन, मद्यपान, संप्रेरक असंतुलन, मोठ्या प्रमाणावर वेदनाशामकांचे सेवन आणि याच्या जोडीला वाढता ताण, पोषणमूल्यांचा अभाव, फास्ट फूड व जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन यामुळे शरीरक्रियेत बदल होऊन गाठिया वात (गाऊट) या वातारोगाची सुरुवात होते.

या वातरोगाला वयाचे बंधन नाही. चार-पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे आईबरोबर १९ वर्षांचा एक मुलगा आला होता. त्या मुलाचे वजन त्यावेळी १०५ किलो होते. त्याला सांध्यांमध्ये, विशेषतः हाताच्या व पायाच्या बोटांच्या सांध्यात वेदना होत्या. खरे तर सगळ्याच सांध्यांमध्ये वेदना आहेत आणि संपूर्ण शरीर अकडले आहे, असे तपासताना माझ्या लक्षात आले. त्याच्यावर तत्पूर्वी बहुतांश प्रकारचे उपचार झाले होते. अगदी एमआरआयपासून सगळ्या चाचण्याही झाल्या होत्या. मी रिपोर्ट्स पाहिले तेव्हा युरिक अॅसिड वाढलेले आढळले. त्या मुलाची नाडीही वात आणि पित्तावर चालत होती. लहान सांध्यांमध्ये वेदना, शरीर अकडलेले, युरिक अॅसिड, नाडी यावरून निदान करायला वेळ लागला नाही…गठिया वात!

मी दोघांनाही परिस्थिती समजावून सांगितली आणि आजार पूर्ण बरा होण्यासाठी सहा ते आठ महिने लागतील याचीही कल्पना दिली. बोलता बोलता स्तब्ध झालो. कारण तो मुलगा आणि त्याची आई, दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. आतापर्यंत झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाचा तो परिपाक होता. उपचारासाठी एक महिना केरळीय पंचकर्म आणि पोटातून औषधं अशी योजना मी त्यांना सांगितली. दोघांनीही संमती दर्शवली आणि उपचाराला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी अभ्यंगम व स्वेदनम केले. दुसऱ्या दिवसापासून एलाकिडी सुरू केली. त्याला नस्यम व बस्तीची जोड दिली. विशिष्ट औषधं आणि आवश्यक त्या औषधी तेलांनी पूर्ण शरीरावर एलाकिडी केली. यामुळे शरीरातील विषद्रव्य व युरिक अॅसिड बाहेर काढण्यास मदत झाली. ज्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड साठले होते, तिथून ते बाहेर काढण्यास या क्रियेची मदत झाली. पहिल्या आठवड्यात त्या मुलाला जवळपास ४० टक्के आराम मिळाला. मात्र काही प्रमाणात पाठीचे दुखणे असल्याने पिडीचिल दिले. नाडीला अनुसरून ४-५ लिटर तेल संपूर्ण शरीरावर टाकले. यानंतर थकवा जाणवला तरी शक्तिवर्धन झाले. पाठदुखी आणि सांधेदुखी दोन्ही कमी झाले.

तिसऱ्या आठवड्यात साधी पोडीकिडी केली. यामुळे सांधेदुखी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. बस्ती व नस्यममुळे शरीरातील विषसंचार बाहेर टाकला गेला आणि वातही कमी झाला. यावेळेपर्यंत वाताची सगळी लक्षणे आणि दुखणे थांबले होते. तरी पण हा त्रास पुन्हा उद्‍भवू नये म्हणून एक आठवडा आणखी उपचार केले. या आठवड्यात फक्त अभ्यंगम् व स्वेदनम् केले. अभ्यांतर चिकित्सा करताना, औषधी द्रव्यांमध्ये विषारी द्रव्य बाहेर काढणाऱ्या औषधांची रचना केली. वातवृद्धी कमी करणारी औषधे दिली. युरिक अॅसिडचे पाचन करण्यासाठी व ते बाहेर काढण्यासाठी औषध योजना केली. त्यानंतर काही विरेचक औषधेही वापरली. प्रथिनयुक्त आहार, काही डाळी, दुधाचे व आंबवलेले पदार्थ बंद करण्यास सांगितले. संपूर्ण उपचारामुळे शरीरातील दोष नाहिसे झाले आणि सोबतच जवळजवळ सहा किलो वजन कमी झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्या मुलाला कोणताही त्रास नाही.