BLOGSUncategorized

वैद्यकीय ज्ञानाच्या परीक्षेची घडी

8

वैद्यकीय ज्ञानाच्या परीक्षेची घडी

 

सर्वे सन्तु निरामया:

 

डॉक्टर म्हटले की अनेक आजार, अनेक प्रकारच्या, विविध पातळ्यांवरच्या समस्या आणि अगणित केसेस! त्यातील काही अगदी साध्या, सहज बऱ्या होणाऱ्या. तर काही अतिशय

क्लिष्ट, गुंतागुंतीच्या. एवढ्या कठीण की डॉक्टर असण्याला त्या आव्हान देतात. केस कशीही असली तरी रुग्ण बरा झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद वेगळेच

समाधान देऊन जातो. काही केसेस अशा असतात की तेथे डॉक्टरचे कौशल्य, बुद्धिमत्ता, अभ्यास सगळेच पणाला लागते आणि आयुष्यभर ती केस, तो रुग्ण लक्षात राहतो. आज

अशीच एक केस पाहू या.

 

केस चिमूरची. तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांनी माझ्याकडे आणली होती. माझ्याकडे रुग्ण म्हणून आलेल्या या रुग्णाचे वय पंचेचाळीस वर्षे होते. व्यवसायाने ते शेतकरी.

माझ्याकडे येण्याच्या एक वर्षपूर्वी शेतावर जात असताना त्यांच्या बंडीचे संतुलन बिघडले आणि ती उलटली. बंडीतून ते समोर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या पाठीवरून आणि उजव्या

खांद्यावरून बंडीचे चाक गेले. त्यांचा खांदा फ्रॅक्चर झाला, तेथील हाडांमध्ये मल्टिपल फ्रॅक्चर झाले.

 

या अपघातानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. काही छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया करून हाडे सेट करण्यात आली. हाडे, दोन महिन्यांनी कशीबशी जुळली पण दुखणे, वेदना मात्र कायम होत्या. हळूहळू त्यांच्या उजव्या हाताच्या स्नायुंमध्ये बदल व्हायला लागला. ते स्नायू कमकुवत होऊन हात बारीक होऊ लागला. ते माझ्याकडे आले तेव्हा हात

खूपच बारीक झाला होता, डाव्या हाताच्या अगदी अर्धा! त्या उजव्या हाताच्या संवेदना जवळजवळ नाहिशा झाल्या होत्या. हात नीट उचलला जात नव्हता. माझ्याकडे येण्यापूर्वी

नागपूरमधील सगळ्या मोठ्या शल्यविशारदांकडे, मुंबईतील लीलावती, केईएम रुग्णालयात, दिल्लीतील एम्स रुग्णालयात ते जाऊन आले होते. सगळीकडे, सगळ्याच डॉक्टर्सनी

त्यांना, हातावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. मात्र, हात बरा होईल याची ५टक्के खात्री सुद्धा कोणीही दिली नाही. माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी असा त्रास केरळीय

पंचकर्माने बऱ्या होऊ शकतात असे ऐकले होते. पण खात्री नव्हती. त्यामुळे तसे ते हताशच होते. नीट तपासणी केल्यावर २१ दिवसांचा उपचार करण्याचे ठरवले आणि तशी त्यांना

कल्पना दिली.

 

पहिल्या दिवशी अभ्यंगम् स्वेदन केले. पुढे तीन दिवस एलाकिडी केले. नस्यम बस्ती पूर्ण २१ दिवस सुरू ठेवले. एलाकिडीनंतर पिडीचिल केले. या गृहस्थांच्या दोषानुसार,

नाडीनुसार तेलाची निवड करून लिटर तेल शरीरावर सोडले. त्यामुळे लवचिकता वाढली, अशक्तपणा कमी झाला.

 

दुसऱ्या आठवड्यात नवराकिडी सुरू केली. नवराकिडीमुळे शरीरात गरमथंडपणा निर्माण होतो तसेच ते बल्य असल्याने चेता पेशी चेतासंस्थेला चालना मिळते. मांसपेशींना दृढता येते. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्यांना जवळजवळ ६०टक्के आराम मिळाला. हातातील रक्ताभिसरण वाढले, संवेदना आली, हाताचा आकार पुर्ववत व्हायला सुरुवात झाली. हात

उचलला जाऊन वर नेता येऊ लागला. तिसऱ्या आठवड्यात नवराकिडी, नस्यम, बस्ती आणि नंतर एका विशिष्ट तेलाने मालिश असा उपचार केला.

 

२१ दिवसांत हे गृहस्थ पुर्ण बरे झाले. हाताची रचना, आकार सामान्य झाले, हालचालही सहज होऊ लागली. अभ्यांतर औषधांमध्ये चेतासंस्थेला बल्य अशी औषधं दिली. २१ दिवसात

आयुर्वेदाच्या मदतीने खूप कठीण, क्लिष्ट गोष्ट साध्य झाली. गेल्या सात वर्षांपासून त्या गृहस्थांना काहीही त्रास नाही.

 

 

 

 

 

0
Leave a Comment