LifestyleSpine pain

पाठदुखीचे दुखणे

back pain

पाठदुखीचे दुखणे

 

पाठदुखी सामान्य वाटत असली तरी तिची कारणे मात्र अनेक असतात. आजचे युग स्पर्धात्मक असल्याने प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. प्रत्येकाला मागे राहण्याची भीती

वाटते. अशावेळी कधी स्वतःसाठी तर कधी कार्यालयासाठी रात्रंदिवस काम करणे भाग पडते. बरेचदा खूप प्रवास होतो. सतत खुर्चीवर बसून दहादहा तास काम, कमी झोप किंवा

निद्रानाश, कौटुंबिक किंवा कार्यालय पातळीवर प्रचंड ताण, पोषणमूल्यांचा अभाव, जंक आणि फास्ट फुड, व्यायामाचा अभाव यामुळे पाठदुखी उद्भवते. ही झाली नेहमीची कारणे.

पण, अनेकदा एखाद्या मोठ्या आजारामुळे शरीरात अशक्तपणा, पाठीचा कणा दुखावला गेला असेल असा अपघात, प्रसूतीच्यावेळी काही चुकांमुळे त्रास, खडतर रस्त्यांमुळे

वाहनावरून पडणे किंवा पाठीला धक्का बसणे यामुळेही पाठदुखीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे पाठदुखी नेमकी कशामुळे याचे योग्यवेळी योग्य निदान आणि उपचार होणे गरजेचे आहे.

 

काही वर्षांपूर्वी अशीच एक केस आली होती. एक वरिष्ठ महिला अधिकारी विमानतळावरून कारने घरी जात होत्या. चालकाला स्पीड ब्रेकरचा अंदाज आल्याने गाडी त्यावरून

उसळली आणि त्या कारच्या छतापर्यंत उसळून पुन्हा सीटवर आल्या. पाठीचा कणा दाबल्या गेला. आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. आठ दिवसाच्या उपचारानंतरही बरे वाटेना.

अनेक डॉक्टर्सचा सल्ला घेऊनही फायदा झाला नाही. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही असे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे रहात होते. परिस्थिती अवघड होती. चालणे, बसणे कठीण

झाले होते. कुणीतरी त्यांना केरळीय पंचकर्म करण्याचा सल्ला दिला. केरळला जाणे त्यांना शक्य नव्हते म्हणून मग माझा पत्ता काढत त्या आल्या. त्यांना उचलूनच क्लिनिकमध्ये

आणावे लागले होते. मी त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगितली. उपचाराचे टप्पे समजावले आणि उपचार सुरू केले.

 

पहिल्या आठवड्यात पोटली मसाज करण्याचे ठरवले. मात्र पहिल्या दिवशी अभ्यंगम, स्वेदन, बस्ती नस्यम्ने सुरुवात केली. मग सात दिवस पोटली मसाज, नस्यम् आणि बस्ती

चिकित्सा केली. नाडी प्रकृतीनुसार वेगवेगळी औषधी वापरली. पोटली मसाजने दबलेला भाग मोकळा केला, नसांना मोकळे केले. वात कमी केला. त्यातील विषद्रव्यांचा संचार

बाहेर काढून टाकला. यामुळे वेदना कमी झाल्या. पाठीतील वाक कमी झाला. दुसऱ्या आठवड्यात कटी आणि त्रिकास्थि (सॅक्रम) भागाला कटीबस्ती केली. डोक्यातील विषद्रव्यांचा

संचार आणि वात कमी झाला. मेंदूची ताकद वाढून मज्जारज्जूला मजबुती मिळाली. तिसऱ्या आठवड्यात पीडिचिल केले. प्रकृती नाडीनुसार तेलाची निवड करून लिटर

 

शरीरावर सोडले. त्यामुळे संपूर्ण शरीरातील लवचिकता वाढली, वात कमी झाला. पाठीतील वाक बराच कमी होऊन मणके स्वस्थ आणि स्वस्थानी स्थापन झाले. मणक्यांचा आणि

पायांचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी झाला. चौथ्या आठवड्यात पुन्हा पोटली मसाज केली. यामुळे पाठीच्या कण्यात असलेला थोडाफार कडकपणा कमी झाला आणि मणक्यातील

उर्वरित थोडेफार बदल सामान्य झाले. सोबत नस्यम् बस्ती केले. पाचव्या आठवड्यात पुन्हा कटीबस्ती, नस्यम बस्ती केली तर सहाव्या आठवड्यात नवराकिडी चिकित्सा केली.

 

या औषधांमुळे चेतासंस्थेला, स्नायूंना, संधिबंधांना, कंडरांना (टेडॉन) बळ मिळाले आणि पाठदुखी संबंधित इतर लक्षणे नाहिशी झाली. अभ्यांतर रचनेत, पाचन सुधारण्यासाठी

पाठीच्या मणक्यातील दोषांचे पाचन, मणक्यातील स्निग्धता वाढवणे, मणक्याची, हाडांची मजबुती वाढवणे, मज्जारज्जूची मजबुती वाढवणे, स्नायू, संधिबंध, कंडरा यांची मजबुती

वाढवणे यासाठी औषध रचना केली. याबरोबरच मणके स्वस्थ व्हावे, मज्जारज्जू मोकळा करून रॅडिक्युलोपॅथी नॉर्मल व्हावी, दबलेला मणका मूळ स्थितीत यावा यादृष्टीने औषधे

दिली.

 

सहा आठवड्यांच्या चिकित्सेनंतर त्या महिला अधिकारी पूर्ण बऱ्या झाल्या आता त्यांना अजिबात त्रास नाही. पाठीचा बेल्ट तर तिसऱ्या आठवड्यातच सुटला होता. त्या व्यवस्थित

चालू शकतात, बसू शकतात, वाकू शकतात.

 

 

 

Read Article in English

0
Leave a Comment