Spine pain

पाठदुखीची वेदना असह्य

spine pain

पाठदुखीची वेदना असह्य

 

आज दुखण्यांच्या बाबतीत विचार केला तर साठ ते सत्तर टक्के लोक पाठदुखीने त्रस्त आहेत. बैठे काम, कमी शारीरिक श्रम, व्यायामाचा अभाव, ताण, धावपळ या सगळ्यांचा

परिपाक म्हणजे पाठ आणि कंबरेचे दुखणे. बरेचदा वेदनाशामक औषधांनी काम भागवले जाते तर कधी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. तरीही पाठदुखी कायमची थांबेल याची

शाश्वती नसते. आयुर्वेदात यावर रामबाण उपाय आहे. मात्र परिणाम दिसेपर्यंत थोडा धीर धरावा लागतो एवढेच. आयुर्वेदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उपचारपद्धतीच्या

अनुषंगाने काही प्रातिनिधिक उदाहरणे देणार आहे. यातून आयुर्वेदाचे महत्त्व विशद व्हावे, हा हेतू आहे.

 

चारपाच वर्षांपूर्वी ४० वर्षांचे एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. आले होते म्हणण्यापेक्षा त्यांना अक्षरशः उचलून आणावे लागले होते. पाठ आणि कंबरेत खूप वेदना होत्या. पायांत

मुंग्या येत होत्या. ते जड झाले होते. सारखे गोळे येत होते. हा त्रास इतका बळावला होता की ते गृहस्थ नीट बसूही शकत नव्हते, उभे राहू शकत नव्हते आणि चालूही शकत नव्हते.

तपासणीसाठी त्यांना झोपताही येत नव्हते. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्यांच्या काही मणक्यांवर दबाव आला होता आणि हाडे मूळ जागेपासून थोडी सरकली होती.

एमआरआय केल्यावर, त्यांच्या मणक्यातील डिस्कही मूळ स्थितीत नसल्याचे आढळले.

 

आयुर्वेदातील सर्वांना परिचित अशी पंचकर्म क्रिया करण्याचे ठरवले. पंचकर्मात वमन, विरेचन, बस्ती, नस्यम् आणि रक्तमोक्षण या क्रियांचा समावेश असतो. प्रत्येक वेळी या पाचही

क्रिया करणे आवश्यक नसते. या गृहस्थांच्या बाबतीत नस्यम् आणि बस्ती करण्याचा निर्णय घेतला.

 

पहिल्या आठवड्यात साधे मालीश, अभ्यंगम्, पोटली मसाज केले. त्यांच्या नाडीनुसार विशिष्ट परिणामकारक तेल मालीश करण्यासाठी वापरले. बरोबर नस्यम् आणि बस्ती होतेच.

तिसऱ्या आठवड्यात कटिवस्थी, नस्यम आणि बस्तीला लेपनाची जोड दिली. तीन आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत ५५ ते ६० टक्के सुधारणा दिसली. चौथ्या आठवड्यात नस्यम् आणि

बस्तीबरोबर पिडीचित क्रिया केली. म्हणजे चार लिटर बल्य तेल शरीरावर घालून मालीश केले. पाचव्या आठवड्यात कटिवस्थी, नस्यम्, बस्ती आणि लेपन क्रिया करून उपचार पूर्ण

 

केलेत.

 

अजिबात हालताही येणारे गृहस्थ आधाराविना व्यवस्थित चालूफिरू लागले. पायातील जडपणा, मुंग्या येणे, गोळे येणे नाहीसे झाले. चार दिवसांची विश्रांती आणि व्यायामानंतर

ते गृहस्थ पुन्हा कामावर रूजू झाले. सहा महिन्यांनी पुन्हा एकदा पाचसहा दिवसांसाठी हाच उपचार केला. उपचाराबरोबर काही औषध पोटातून घ्यायलाही दिली होती. गेल्या चार

वर्षांत त्यांना काहीच त्रास झालेला नाही. मसाजाच्या माध्यमातून अशा विकृती दूर करता येतात.

 

सांध्यांवरील वंगण कमी झाल्यास ते वाढविणे गरजेचे असते. स्नायूंना, मांसपेशींना स्थैर्य आणि बल मिळाले पाहिजे. मज्जारज्जू मजबूत करणे आणि मणक्यांना बल देऊन

 

पूर्वास्थितीत आणणेही तितकेच महत्त्वाचे. नस्यममुळे नाकातून डोक्यात तेल जाते. विषारी पदार्थ विरळ होऊन बाहेर पडतात. मज्जारज्जूला स्थैर्य आणि बल मिळते. बस्तीमुळे

वात कमी होतो. शरीरातील विषारी पदार्थ पोटातून बाहेर पडतात. एरवीही, पाठीचा त्रास असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा मसाज करून घ्यावा. ४५ मिनिटांच्यावर खुर्चीत बसू नये.

योगासने करावीत. सकाळी पायी फिरायला जावे, रात्री शतपावली करावी. बरेच अंतर ड्रायव्हिंग करायचे असेल तर पाठीला झटका बसरणार नाही, ताण पडणार नाही याची काळजी

घ्यावी. वेळोवेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1
Leave a Comment