BLOGS

नवराकिडी

नवराकिडीनवराकिडी

नवराकिडी या क्रियेला षष्टिकाशाली पिंड स्वेदमही म्हटले जाते. यामध्ये मलमलच्या पिशवीत ‘नवरा’ नावाच्या तांदळाच्या द्रावणाबरोबर काही औषधांची गाठ बांधून ते संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या विशिष्ट भागावर लावून किंवा फिरवून घाम आणला जातो. मल्याळम भाषेत ‘नवरा’ म्हणजे तांदुळ (संस्कृतमध्ये षष्टिकाशाली). हा तांदूळ ६० दिवसात उगतो; किडी (संस्कृतमध्ये पिंड) अर्थात ग्रास किंवा गाठ. ‘नवरा’ हा औषधी गुण असलेला तांदूळ केरळमध्ये उगवला जातो आणि हे एक देशी वाण आहे. आणि नवराकिडी ही केरळमधील आयुर्वेद चिकित्सकांद्वारे उपयोगात आणली जाणारी एक अनोखी उपचार प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया १४ दिवसांच्या कालावधीसाठी दर दिवशी ४५ ते ६० मिनिटांसाठी २ ते ४ मसाह करणार्‍या व्यक्तींकडून केली जाते. सगळ्या प्रकारची सांधेदुखी, अंग दुर्बलता, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि काही स्नायु रोगांसाठी उपचाराचा हा प्रकार प्रयोगात आणला जातो. उकडलेल्या ‘नवरा’ तांदुळाबरोबर विविध प्रकारचे कषाय आणि क्षीर यांचा ग्रास करुन एकांग किंवा सर्वांगावर लावला जातो. ‘नवरा’ स्निग्ध, गुरु, स्थिर, शीत आणि त्रिदोषाघ्न आहे, स्वेद कर्म असूनही ब्रम्हनगुण आहे.  द्रोणीच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दोन चिकित्सकांद्वारे दोन गरम किडी लावले जातात.  यानंतर दुसर्‍या हाताने हलकी मालिश केली जाते.  आपल्या तळव्याच्या मागील बाजूने ग्रासाला स्पर्श करुन तो रुग्णास सहन होण्यासारखा
आहे की नाही हे सुनिश्चित केले जाते.  दूध आणि कषायाच्या मिश्रणात वारंवार ग्रास बुडवून त्याचे तापमान कायम ठेवावे लागते.  रुग्णामध्ये सम्यकस्विन्नलक्षण दिसू लागेपर्यंत किंवा ग्रास सामग्री संपेपर्यंत प्रक्रिया केली
जाते.  प्रक्रियेच्या शेवटी, नारळाच्या पानांनी शरीरावर लागलेली तांदळाची पेस्ट काढली जाते. पुन्हा एकदा गरम औषधी तेलांनी हलके मालिश केले जाते. ही प्रक्रिया कायासेकमनुसार सात स्थितींमध्ये चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार केली जाते. नवराकिडीचे लाभ  चेतासंस्थेसंबंधी आजार असणार्‍या रुग्णांसाठी अतिशय परिणामकारक उपचार  दीर्घकालिक आमवात, ऑस्टियोअर्थ्रायटिससाठी  पक्षाघात  स्नायुंमधे अशक्तपणा  अंग दुर्बलता आणि दूषित रक्तामुळे असणार्‍या रोगांसाठी  वय वाढण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करते  शरीरास कोमल करुन अकडले असेल तर त्याचे निवारण होते  शरीरास आराम देते आणि शांत झोपे येते  रक्ताभिसरनात सुधारणा आणि शरीराचे निर्विषीकरण करते  मांसपेशी, स्नायु विकसित करुन शरीरास मजबूत करते.  वर व वधूच्या त्वचेला तजेला व चमक देते.

0
Leave a Comment