BLOGSOsteoporosis

कॅल्शियमची कमतरता आणि सांधेदुखी

download

कॅल्शियमची कमतरता आणि सांधेदुखी

 

 

सर्वे सन्तु निरामया:

 

वेगाने बदलणारी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारात पोषणमूल्यांची कमतरता, विशेषतः कॅल्शियमची, यामुळे हाडे कमकुमत होतात. वाढत्या वयानुसार साध्यांची झीज होते.

वंगन कमी होऊन ठिसूळपणा येतो. परिणामी हाडांसंबंधीच्या समस्या जाणवायला सुरुवात होते. सांधेदुखी आणि त्यासंबंधी अन्य त्रास प्रकर्षाने जाणवतात.

 

सहासात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ५८ वर्षांचे एक गृहस्थ असह्य गुडघेदुखीची तक्रार घेऊन आले होते. दोन्ही गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना! पुरुषांमध्ये सहसा आढळत नाहीत पण या

गृहस्थांच्या दोन्ही पायांमध्ये वाक होता. दोन्ही पायांवर सुज होती. स्पर्शही सहन होत नव्हता. संधीची चालना करून पाहिल्यावर लक्षात आले की गुडघ्यांमधूनकटकटअसा

आवाज येत होता. गुडघ्यांच्या मागील भागाचा नसा लागून आल्या होत्या, अकडलेल्या होत्या. दोन्ही गुडघ्यांबरोबर कंबरही दुखत होती. त्यामुळे राहूनराहून मांडीतही वेदना होत्या.

दोन्ही पायांवर ते पाच मिनिटांपेक्षा जास्त उभे राहू शकत नव्हते. दोन्ही गुडघ्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली होती. अॅसिडिटीचा त्रास होता आणि पचनही व्यवस्थित नव्हते.

बद्धकोष्ठही होतेच.

 

माझ्याकडे येण्यापूर्वी ते इतर काही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन आले होते. पंचकर्मही करून घेतले होते पण काही विशेष फरक पडला नव्हता. त्यापूर्वी ते ऑर्थोपेडिक सर्जनकडेही

जाऊन आले होते. त्यांनी गुडघे रिप्लेस करण्याचा सल्ला दिला होता.

 

सगळी तपासणी केल्यावर, अभ्यांतर चिकित्सा महिने आणि कमीत कमी दीड महिना पंचकर्म करावे लागेल असे सांगितले. त्यावर ते उपचाराला तयार झाले. पहिल्या दिवशी

अभ्यंगम् स्वेदन केले. दुसऱ्या दिवसापासून एलाकिडी आणि नस्यम् बस्ती उपचार सुरू केले. परंतु यामुळे, विशेषतः पहिल्या आठवड्यात काही परिणाम झाल्याचे आढळले

नाही. म्हणून दुसऱ्या आठड्यात चिकित्सेत बदल केला. जानुधारा, नस्यम् बस्ती सुरू केले. दुसऱ्या आठवड्यातही पहिले दिवस काही परिणाम दिसले नाही. सहाव्या सातव्या

दिवशी सकारात्मक परिणाम दिसले. या गृहस्थांच्या बाबतीत असे लक्षात आले की त्यांचा त्रास खूप जुना होता. त्यामुळे व्याधी वाढली होती. नीट उपचार झाल्याने एक पोफळी

झाली होती म्हणून दोन आठवडे परिणाम दिसले नाही.

 

 

तिसऱ्या आठड्यात पुन्हा जानुधारा केली. सोबत नस्यम बस्ती सुरू ठेवले. जानुधारेसाठी नाडीप्रमाणे तेल निवडले होते. तसेच ज्या औषधांचा लेप केला होता. त्यामुळे हाडांची झीज

भरून काढण्यासाठी तेथिल स्निग्धता वाढवण्यास मदत झाली. बस्ती नस्यममुळे वाताचे शमन करून विषद्रव्य शरीरबाहेर काढण्यास मदत झाली.

 

चौथ्या आठवड्यात जानुबस्ती, लेप, नस्यम बस्ती केले. या आठड्याच्या शेवटी जवळपास ५० टक्के परिणाम दिसले. पाचव्या आठड्यात पुन्हा एलाकिडी उपचार केले. या संपूर्ण

चिकित्सेमुळे पुर्ण रक्ताभिसरण वाढले, संधिबंध,कंडरा, स्नायुंची ताकद वाढली, हाडे पूर्ववत होऊ लागली. सायनोव्हियल फ्लुइड पूर्ववत होऊ लागले. सहाव्या आठड्यात जानुधआरा,

लेप, नस्यम् बस्ती पुन्हा केले. आता त्या गृहस्थांना जवळपासं पूर्ण बरे वाटू लागले. पुढचे तीन महिने पोटातून औषधे घेणे सुरू ठेवण्यास त्यांना सांगितले. पचन सुधारून,

रक्ताभिसरण वाढवून कॅल्शियमची कमतरता दूर करून हाडांचा ठिसूळपणा घालवणारी औषधे त्यांना दिली, तसेच शरीरातील विषद्रव्यांचा संचार नाहिसा, करणारी, स्नायु,

संधिबाधांना, संपूर्ण शरीर रचनेला ताकद देणारी वार्धक्यजन्य वात कमी करणारीही औषधे दिली. या गृहस्थांना गेल्या सहा वर्षांपासून आतापर्यंत कोणताही त्रास नाही. दर

महिन्यात नियमितपणे ते तपासणी येतात. शस्त्रक्रियेची गरजच पडली नाही. योग्य काळजी घेतल्यास योग्य चिकित्सा केल्यास गुडघ्यांचे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात

शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.

 

5
Leave a Comment