BLOGSTremor

कंपवात स्थिर व्हावा!

tremor

कंपवात स्थिर व्हावा!

 

 

आजची जीवनशैली म्हणजे खूप धावपळ, प्रचंड दगदग, तीव्र स्पर्धा आणि यामुळे येणारा अतिताण, दबाव, आहारात पोषणमूल्यांची कमतरता! जोडीला, या स्पर्धेत कोणीतरी

आपल्यासमोर निघून जाईल ही भीती. सोबच जन्मतःच वातल प्रकृती, जनुकीय आजार, वात वाढवणाऱ्या आहारद्रव्यांचे सेवन, रात्रीचे जागरण आणि दिवसा झोपणे, आवश्यकता

नसताना किंवा अनावश्यक विचार करण्याची सवय, अपघातात झालेली एखादी मोठी इजा, कामाच्या ठिकाणी असलेला मानसिक दबाव, नैराश्य, आत्मविश्वासाची कमतरता या

सगळ्यामुळे उद्भवणारा आजार म्हणजे कंपवात!

 

कंपवात असलेले एक ५२ वर्षांचे गृहस्थ आले. त्यांना दोन्ही हातापायांमध्ये, मानेत कंप होता. डोकेदुखी होती. पचन व्यवस्थित नव्हते. नाडीमध्ये वाताचे आधिक्य होते. सहासात

वर्षांपासून त्यांना असा त्रास होता. अनेक उपचार झाले. तात्पुरता फरक पडायचा, पुन्हा जैसे थे! त्यांच्यावर दीड महिन्यासाठी पंचकर्म चिकित्सा आणि सहा महिन्यांसाठी पोटातून

औषधे घेण्यास सांगितले.

 

 

पंचकर्मात सुरुवातीला, डोक्यात झालेले क्षयजन्य परिवर्तन बरे करण्यासाठी चिकित्सा सुरू केली. हे परिवर्तन दूर झाल्याशिवाय मेंदूला बल आणि स्थैर्य मिळत नाही. कितीही उपचार

केले तरी शंभर टक्के परिणाम होणार नाही. परिवर्तन दूर करण्यासाठी आधी शिरोधारेची योजना करून मर्म सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आणि मेंदूचे पोषणही त्याद्वारे केले. डोके

शांत करून तेथील वात कमी करण्याचा प्रयत्न केला. बस्ती चिकित्साही केली. यामुळे बद्धकोष्ठ दूर होऊन वात कमी होण्यास विषद्रव्य बाहेर काढण्यास मदत झाली. अभ्यंगम्

आणि स्वेदनही सुरू ठेवले. यामुळे रक्ताभिसरण वाढले. वात कमी होण्यास वेग मिळाला. शरीरातील क्षयजन्य परिवर्तन बरे करून स्थैर्य आणि बल देण्यास मदत झाली.

 

दुसऱ्या आठड्यात शिरोबस्ती केली. यावेळी डोळे नाकातून तेल दिसते का याकडे लक्ष दिले. शिरोबस्तीमुळे मेंदूचे षोषण झाले. मोठ्या प्रमाणावर वात कमी होण्यास मदत झाली

आणि मेंदूतील मृत पेशींचे पुनरुज्जीवन होऊन त्या सक्रिय झाल्या. बस्ती, अभ्यंगम स्वेदनही सुरू ठेवले. कंप कमी झाला. तिसऱ्या आठवड्यात पिडिचिल म्हणजे चारपाच लिटर

तेल शरीरावर एका सतत धारेत सोडले. तेल सोडताना त्याचे तापमान सम ठेवले हलके मसाज केले. यामुळे शरीराचे बल आणि स्थैर्य वाढून कंपवात कमी झाला. नस्यम् चालू

ठेवले. त्यामुळे डोक्यातील विषद्रव्य बाहेर काढण्यास मदत झाली.

 

चौथ्या आठवड्यात नवराकिडी केली. म्हणजेनवरानावाच्या तांदळापासून काही आयुर्वेदिक बल औषधांची पोटली करून त्याने शरीराला मसाज केला. यामुळे चेतासंस्था,

चेतापेशींना बल स्थैर्य वाढले. याबरोबरच नस्यम बस्तीही होते. पाचव्या आठवड्यात पुन्हा शिरोधारा, अभ्यंगम, स्वेदनम बस्ती दिले. सहाव्या आठवड्यात थलपोडिचिल

म्हणजे पित्त वातनाशक औषधी पुर्णांची पेस्ट करून त्याचा डोक्यावर लेप दिला. सोबत नवराकिडी केले. पोटात दिलेल्या औषधांमुळे पाचन दीपन सुधारला. बल स्थैर्य

वाढण्यास मदत झाली. डोक्यासाठी दिलेल्या औषधामुळे धी, धृती स्मृती वाढली. शरीरातील पूर्ण दोषांचे शमन होऊन कंपवात बरा करण्यास मदत झाली. यासाठी मानसमित्रवडकम,

स्मृती ग्रॅन्युल्स, ब्राह्मी, सारस्वतारिष्टम, जटामांसी अशा औषधींचा वापर केला. त्यांना लाभ झाला.

 

कंपवात असल्यास लक्षणांबरोबर शरीरात अशक्तपणा, हातपाय अजिबात स्थिर राहणे, हातापायाला मुंग्या येणे, डोके खूप जास्त हलके किंवा खूप जड झाल्यासारखे वाटणे,

डोक्यात (मेंदूत) क्षयजन्य परिवर्तन, त्यामुळे डोकेदुखी, संपूर्ण शरीरात क्षयजन्य परिवर्तन, शरीरात मोठ्या प्रमाणावर वातवृद्धी, डोक्यात सतत बहुविध विचार, एका जागेवर सरळ

उभे राहणे शक्य होणे अशीही लक्षणे दिसू शकतात, त्यामुळे काळजी घेणे कधीही गरजेचे.

 

 

 

 

 

1

2 Comments

Leave a Comment