AyurvedicBLOGS

आयुर्वेदात संयम हवा…

ayurvedic

आयुर्वेदात संयम हवा

 

काही वर्षांपूर्वीची केस. माझ्याकडे एक गृहस्थाला त्यांच्या नातेवाइकांनी अक्षरशः उचलून आणले होते. आल्याआल्या त्यांनीच सांगायला सुरुवात केली. स्कूटरवरून जाताना पाठीला

जबरदस्त धक्का बसला आणि पाठ दुखायला सुरुवात झाली. काही दिवसांनी कंबरही दुखायला लागली. पायात चमका निघायला लागल्या, मुंग्या येणे सुरू झाले. डाव्या पायापेक्षा

उजव्या पायाला जास्त त्रास होता. उजवा पाय जास्त अकडलाही होता. मग ऑर्थोपेडिक सर्जनकडे धाव घेतली. त्यांनी एमआरआय करायला सांगितले. एमआरआयमध्ये एल३

एल४एल५ यामध्ये खूपच दाब आल्याचे आणि रॅडिक्युलोपॅथी उजव्या पायात असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांनी आधी फिजियोथेरपी घ्यायला सांगितले. त्याने काही आराम

पडला नाही. काही औषधही दिली होती. पण परिणाम शून्य! मग न्युरोसर्जनचा सल्ला घ्यावा असे त्यांनी सुचवले. न्युरोसर्जननी शस्त्रक्रिया करायला सांगितले. लगेचच्या

आठवड्यात ऑपरेशन केले. बरे वाटत असतानाच काही दिवसांतच दोन्ही पायांतील संवेदना नाश झाल्या. न्युरोसर्जनने पुन्हा ऑपरेशन करायला सांगितले. तेही झाले. पण विशेष

आराम पडला नाही. प्रचंड निराशा आली. केरळीय पंचकर्माने हे बरे होऊ शकते, असे त्या गृहस्थांच्या वाचनात आले. शोध घेत घेत ते शंकरनगर मधील माझ्या क्लिनिकमध्ये

पोहोचले. सगळ्या शक्यतांचा विचार करून, बरे होण्यास तीनसाडेतीन महिने लागतील, असे त्यांना सांगितले. त्यात पंचकर्म अडीच महिने आणि पुढे फक्त औषधोपचार.

 

पंचकर्म उपचाराच्या पहिल्या दिवशी अभ्यंगम आणि स्वेदन केले. दुसऱ्या दिवसापासून पुढे सात दिवस एलाकिडी केली. सोबत नस्यम बस्तीही सुरू केले. एलाकिडीमुळे रक्तसंचार

वाढून विषद्रव्ये कमी झाली. सोबतच पाठीच्या मणक्यातील शिथिलता वाढली. दुसऱ्या आठवड्यात लिटर तेलाने पिडिचिल केले. पिडिचिल करताना नाडी दोषानुसार तेलाची

निवड केली. नस्यम बस्ती सुरू ठेवले. पिडिचिलमुळे सर्व शरीरातील वात कमी होऊन, रक्तसंचार वाढून स्नायू, मांसपेशी, मज्जारज्जू, कंडरा शिरा सगळ्यांना मजबुती

मिळण्यास मदत झाली.

 

तिसऱ्या आठवड्यात नवराकिडी केली. त्यामध्ये बल्यद्रव्यांचा संवेदना प्राप्त करून देणाऱ्या तसेच नाडीनुसार औषधी द्रव्यांचा उपयोग केला. पुढे चौथ्या आठवड्यातही हाच

उपचार सुरू ठेवला. पाचव्या आठवड्यात पुन्हा एलाकिडी, नस्यम बस्ती केले. पाठीच्या कण्यावर विशिष्ट द्रव्यांचा लेप केला. ही प्रक्रिया १५ दिवस केली. सातव्या आठवड्यात

पुन्हा नवराकिडी, नस्यम बस्ती असा उपचार केला. नस्यममुळे डोक्यातील विषद्रव्यांचा संचार बाहेर पडला तसेच मेंदूच्या हालचाली वाढून बल मिळाले त्यामुळे मज्जारज्जूला

सुद्धा बल मिळून तो पुनरुज्जीवित होऊ लागला. तसेच बस्तीमुळे हाडांवर, वातावर मज्जारज्जूवर एकत्रित कार्य झाले. आठव्या आठवड्यातही हाच उपचार केला. चौथ्या

आठवड्यात पायांना संवेदना जाणवायला सुरुवात होती ती आठव्या आठवड्यापर्यंत दृढ झाली आणि आठव्या आठवड्याच्या शेवटीशेवटी ते स्वतःच्या पायावर उभे राहून एकएक

पाऊल टाकू लागले. एव्हाना उपचाराचा ७०८० टक्के परिणाम झाल्याचे दिसत होते.

 

नवव्या आठवड्यात पुन्हा पिडिचिल केले. पाठीला औषधी द्रव्यांचा लेप दिला. शिरोबस्तीही केली. दहाव्या आठवड्यात थलपोडिचिल केले. अभ्यंगम स्वेदन केले. पाठीच्या

कण्याला औषधी द्रव्यांचा लेपही केला. अभ्यांतर औषध रचनेत, पाठीच्या कण्यावर, मज्जारज्जूवर मेंदूवर कार्य करून पाठीच्या कण्यातील स्निग्धता वाढवणाऱ्या, मजबुती

निर्माण करणाऱ्या औषधी दिल्या. आयुर्वेदामुळे बऱ्याच प्रकारच्या दुर्धर व्याधी मुळासकट बऱ्या होऊ शकतात. फक्त संयम ठेवण्याची गरज आहे.

 

0
Leave a Comment