BLOGSUncategorized

आमवात… एक असह्य वेदना

आमवात… एक असह्य वेदना

 

सांध्यांमध्ये असह्य वेदना असलेल्या एक काकू भेटायला आल्या. त्या त्यांची व्यथा सांगू लागल्या.

काकू : विचित्रच काहीतरी होत डॉक्टर! माझ्या सांध्यांमध्ये वेदना होतात. अगती असह्य. त्यात आतून गरमपणा जाणवतो. स्पर्शसुद्धा सहन होत नाही. सांध्यावर सुजही असते.

मी : आणखी काय होतं?

काकू : अहो, काय सांगू? एका सांध्याचं दुखणं कमी होत नाही तर दुसऱ्या सांध्यात वेदना व्हाययला लागतात. विंचू दंश झाल्यासारख्या वेदना असतात त्या! शिवाय भूकही कमी झाली आहे.

त्यांचे रिपोर्टस् पाहिले. एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (ईएसआर) वाढलेला होता आणि रुमॅटिक अर्भ्रायटिस फॅक्टर ‘पॉझिटिव्ह’ होता.

मी : हा आमवात! वातरोगाचा एक प्रकार.

ताण, आहारमूल्यांची कमतरता, व्यायामाचा अभाव, जास्तीत जास्त बैठे काम, खूप जास्त प्रवास, अतिश्रम, रात्री जागरण आणि दिवसा झोप अशा अनेक कारणांमुळे अशा प्रकारे भेडसावणारे वातरोग होतात. अलीकडे या कारणांमध्ये जंक फूड आणि फास्ट फूडचीही भर पडली आहे.

काकू : मी सगळ्या प्रकारचे औषधोपचार केले आहेत. कशाने काही फरक पडला नाही. सगळ्या ‘पॅथी’ करून झाल्या. आयुर्वेद तेवढा राहिला होता. माझा त्रास कमी होऊ शकतो का?

मी : ‘आमवात’ हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल असे विशिष्ट उपचार आयुर्वेदात आहेत. लक्षणांची चिकित्सा उपचार केला जातो. उपचाराचा विचार करताना, आजार कसा होतो किंवा झाला आहे याचा विचार केला जातो. आता तुमच्या बाबतीत काय आहे ते सांगतो.

तुम्हाला ‘आमवात’ आहे. म्हणजे तुमच्या संधीवर वात वाढला आहे. त्या वातावर ‘आमाचा’ म्हणजे ‘विषाचा’ संचय झाला आहे. आमवाताबाबत कळीचा मुद्दा असा की स्नेहद्रव्याने वातविरोधी चिकित्सा केली तर ‘आम’वाढतो आणि ‘आम’ कमी करण्यासाठी चिकित्सा केली तर वात वाढतो.

काकू : मग कसं काय साधणार?

मी : मग काय! दोन्हीचा परस्परसंबंध साधून त्यांना मुळासकट काढण्यासाठी वात आणि आम यांची क्रमा-क्रमाने आनुषंगिक चिकित्सा करावी लागते. तेच आपण करणार आहोत. पोटातून औषध देताना शरीराची पचनशक्ती वाढेल अशी वातहारक औषधे देईन. महारसनाधी काढा, रास्नासप्तक काढा, सिंहनाद गुग्गुळ अशी योजना करू. पोट साफ व्हावे आणि आमसंचिती व वात कमी होण्यासाठी दररोज सुंठसिद्ध एरंडेल तेल तुम्हाला घ्यावं लागेल.

काकू : बरं आणि आयुर्वेदात बरीच तेलं आणि मसाज वगैरे असतं म्हणे. तस काही नाही?

मला हसूच आले. काकूंनी बरीच माहिती गोळा केलेली दिसली.

मी : आहे तर! याबरोबरच केरळीय पंचकर्मात दोषांच पाचन करण्याकरता एलाकिडी (पोटली मसाज) किंवा पोडिकिडी चिकित्सा देतात. वात आणि विष बाहेर काढण्यासाठी काढा आणि तेलाची बस्तीही असेल. अनुतेलानी नस्यम् चिकित्साही करता येते. सांध्यांमध्ये जास्त वेदना व गरमपणा म्हणजे विषद्रव्य जास्त! तेव्हा वालुका पोटली स्वेदही करावे लागेल असं दिसतंय.

काकू : आणि पथ्य?

मी : आहे तर. थंड, आंबट, खारट, गोड, जड, वातुळ पदार्थ कटाक्षाने टाळावे. चिंच, लिंबू, कैरी, टोमॅटो, डालडा, लोणचे, आइस्क्रीम, आंबा पूर्णपणे बंद! वेदनाशामक गोळ्या घ्यायच्या नाही. वेडंवाकडं बसू नका, बैठक नको. उगाच दगदग नको. अती श्रम नकोत. उकडले तरी चालेल पण अंग गार पडू देऊ नका. म्हणजे एसी, कूलर नको. नेहमी सुंठचुर्ण मिसळून गरम पाणी प्या. मुग, आले, लसूण, जिरे, सुंठ भाजून त्याचे सेवन करता येईल. शिवाय हलका व्यायाम!

आमवातावरचा हा आयुर्वेदातला हमखास उपाय आहे. उपचारात सातत्य, पथ्य पाळल्यास हा आजार निश्चितच बरा होऊ शकतो.

 

 

 

0

2 Comments

  • I have been browsing on-line more than 3 hours nowadays, but I never discovered any interesting article like yours. It is beautiful value sufficient for me. In my opinion, if all webmasters and bloggers made good content as you did, the web shall be much more useful than ever before.
    stevie

Leave a Comment