BLOGSSpine pain

असह्य पाठदुखी

पाठदुखीपाठदुखी

 

४ वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणॆझाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. एवढ्यावरच थांबले नाही. पायात चमका निघणे, मुंग्या येणे सुरु झाले. काही दिवसांनी उजव्या पायात कडकपणा आला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी एमआरआय करायला सांगितले. एमआरआयमध्ये एल३-एल४- एल५ या मणक्यांमध्ये खूप जास्त दाब (कॉम्प्रेशन) आल्याचे स्पष्ट दिसत होते. उजव्या पायात रॅडिक्युलोपॅथी दिसत होती. म्हणून फिजियोथेरपी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण त्याने काही विशेष आराम किंवा फरक पडला नाही. त्यामुळे न्युरोसर्जनने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानंतर लगेच त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन केल्यावर थोडे बरे वाटत होते. पण काही दिवसातच त्यांच्या दोन्ही पायातील संवेदना नाहीशा
झाल्या. न्युरोसर्जनने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. ती पण केली. पण विशेष आराम पडला नाही. केरळीय पंचकर्माने ही समस्या बरी होऊ शकते असे त्यांना कळले आणि इथे कोण असे पंचकर्म करुन देते याचा शोध घेत ते माझ्याकडे येऊन पोहचले. पोहचले काय! त्यांना उचलूनच क्लिनिकमध्ये आणले होते. ऑपरेशन आणि त्यांच्या परिस्थितीला फक्त दिड महिना झाला होता. त्यामुळे केरळीय पंचकर्माने ते लवकर बरे होऊ शकतील असे मला मनापासून वाटत होते. म्हणून त्यांना औषधोपचारासाठी तीन ते साडे तीन महिने द्यावे लागतील असे सांगितले. त्यातले अडीच महिने पंचकर्मासाठी लागतील याची त्यांना कल्पना दिली. पहिल्या दिवशी, अभ्यंगम व स्वेदन केले. दुसर्‍या दिवसापासून पुढे सात दिवस एलाकिडी केले. सोबत बस्ती व नस्यम सुरु केले. एलाकिडीमुळे रक्तसंचार वाढून विषाक्तता कमी झाली. सोबतच पाठीच्या मणक्यातील शिथिलता वाढली. दुसर्‍या आठवड्यात ४-५ लिटर तेलाने पिडिचिल केले. पिडिचिल करताना नाडी व दोषानुसार तेलाची निवड केली. यामुळे संपूर्ण शरीरातील वात कमी होऊन, रक्तसंचार वाढून स्नायु, मांसपेशी, मज्जारज्जू, कंडरा व शीरा सगळ्यांना मजबूती मिळण्यास मदत झाली. जोडीला नस्यम व बस्ती होतेच.
तिसर्‍या आठवड्यात नवराकिडी केले. यामध्ये बल्यद्रव्यांचा आणि नाडीनुसार, संवेदना प्राप्त करुन देणार्‍या औषधी द्रव्यांचा उपयोग केला. पुढे एकूण दोन आठवडे हाच उपचार केला. नस्यम ब बस्ती सुरुच ठेवले. पाचव्या आठवड्यात पुन्हा एलाकिडी, नस्यम, बस्ती केले. पाठीच्या कण्यावर विशिष्ट औषधी द्रव्यांचा लेप दिला. ही प्रक्रिया १५ दिवस केली. सातव्या आठवड्यात पुन्हा नवराकिडी, नस्यम व बस्ती केले. नस्यममुळे डोक्यातील विषद्रव्यांचा संचार बाहेर पडला तसेच मेंदूच्या हालचाली वाढून बल मिळाले व त्यामुळे मज्जारज्जूला सुद्धा बल मिळाले व तो पुनरुज्जिवित होऊ लागला. तसेच बस्तीमुळे हाडांवर, वातावर, मज्जारज्जूवर एकत्रित कार्य झाले. या सगळ्यामुळे जवळपास ४ आठवड्यात पायांना
संवेदना जाणवू लागल्या, हालचाल वाढली. आठव्या आठवड्यातही हेच उपचार केले. यामुळे आठव्या आठवड्याच्या शेवटी-शेवटी ते स्वतःच्या पायावर उभे राहून एक-एक पाऊल टाकू लागले. त्यांना ७०-८० टक्के आराम पडला. नवव्या आठवड्यात पुन्हा पिडिचिल केले. औषधी द्रव्यांचा लेप पाठीला दिला. तसेच शिरोबस्ती पण केली. दहाव्या आठवड्यात थलपोडिचिल केले. अभ्यंगम व स्वेदन केले. पाठीच्या कण्याला लेपनही केले. अभ्यांतर औषध रचनेत पाठीच्या कण्यावर, मज्जारज्जूवर व मेंदूवर कार्य करुन पाठीच्या कण्यातील स्निग्धता वाढवणार्‍या, मजबूती निर्माण करणार्‍या औषधी दिल्या. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ते गृहस्थ पूर्णपणे बरे झाले. त्यांना व्यवस्थित चालता येऊ लागले. आज ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

0
Leave a Comment